पोटच्या मुलांना एसटी बसमध्ये सोडून आई प्रियकरासोबत पळाली; बीडमधील हृदयद्रावक घटना

समाचार सुनें AI वाचक उपलब्ध है


बीड, वार्ताहर | २१ मे २०२६ एसटी बसमध्ये एकट्या रडत बसलेल्या दोन चिमुरड्यांनी सर्वांचे मन हेलावले, बीड जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांना पंढरपूर-छत्रपती संभाजीनगर एसटी बसमध्ये एकट्याने सोडून दिले आणि ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

खिशातील चिठ्ठीने उघडकीस आले सत्य

प्रेमात आंधळ्या झालेल्या या आईने मुलांच्या खिशात एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीतील मजकूर वाचून पोलिसांनाही धक्का बसला. चिठ्ठीत लिहिले होते —

"या मुलांचे आई-वडील हयात नाहीत. यांना यवतमाळच्या बसमध्ये पाठवून द्या."

त्यासोबत यवतमाळमधील पत्ता आणि मुलांच्या आजोबांचा मोबाईल नंबरही दिला होता. मुलांना सुखरूप पोहोचवण्याची विनंतीही त्यात करण्यात आली होती.


कंडक्टरच्या सतर्कतेमुळे मुले सुरक्षित

बसमध्ये ही दोन्ही मुले एकटी बसून रडत होती. बसच्या कंडक्टरने त्यांना पाहिले आणि त्याला संशय आला. त्याने तातडीने बीड पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, मुलांशी बोलले आणि त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. चिठ्ठीवरील नंबरवर फोन केल्यावर ती व्यक्ती मुलांचे आजोबा असल्याचे समजले. त्यांना तातडीने बीडला बोलावण्यात आले.

आजोबा आले पण नातवंडांकडे ढुंकूनही पाहिले नाही!

यात सर्वात धक्कादायक म्हणजे यवतमाळहून आलेल्या आजोबांनी मुलांना जवळ घेणे तर सोडाच, त्यांच्याकडे नजरही टाकली नाही. उलट त्यांनी पोलिसांना विचारल.

"मुलगी पळताना घेऊन गेलेली स्कूटी आणि रोख रक्कम कुठे आहे?"

पोलिसांनी सांगितले की या वडिलांनी ३० एप्रिल रोजी यवतमाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की त्यांची मुलगी स्कूटी व रोख रक्कम घेऊन घरातून पळून गेली आहे. सध्या बीड आणि यवतमाळ पोलीस त्या महिला व तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

मुलांची रवानगी शिशुगृहात

आई पळाली, आजोबांनी स्वीकारण्यास नकार दिला — अशा परिस्थितीत प्रशासनाला या दोन्ही निरागस मुलांना बीडमधील शिशुगृहात दाखल करणे भाग पडले.


बालकल्याण समितीचे आवाहन

बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी बीड पोलिसांना सांगितले की मुलांच्या संगोपनासाठी शासनाच्या विविध यंत्रणा उपलब्ध आहेत. अडचणीत सापडलेल्या पालकांनी मुलांना रस्त्यावर सोडण्याऐवजी.
AI मुख्य सारांश